कार्यक्रम आणि उपक्रम
विचारांपासून कृतीपर्यंत — सबलीकरणाच्या वाटचालीत जिजाऊ ब्रिगेड!
महिला, युवक आणि समाज — या तिन्ही घटकांना एकत्र आणणारी जिजाऊंच्या प्रेरणेवर चाललेली चळवळ.
जिजाऊ ब्रिगेडचा प्रत्येक उपक्रम हा समाजातील सकारात्मक बदलाची दिशा आहे. आम्ही केवळ कार्यक्रम करत नाही, तर प्रत्येक प्रकल्पातून संस्कार, संघटन आणि सबलीकरण यांचा संदेश पोहोचवतो. महिलांसाठी स्वावलंबनाचे धडे, युवांसाठी नेतृत्व प्रशिक्षण आणि समाजासाठी सेवा — हीच आमच्या कार्याची खरी ओळख आहे.
मुख्य उपक्रम श्रेणी

महिला सबलीकरण
महिलांना आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम बनवणे हे जिजाऊ ब्रिगेडचे प्रमुख ध्येय आहे. ‘मातृशक्ती अभियान’, ‘हुनर ते रोजगार’, आणि ‘स्वावलंबन कार्यशाळा’ यांसारख्या उपक्रमांद्वारे महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दिला जातो.

महानायिका पूजन
अंधश्रद्धा आणि कर्मकांडाच्या विळख्यातून बाहेर निघून वैचारिक क्रांती व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजेच महानायिका पूजन, चरित्र वाचन आणि चिंतन

सामाजिक सेवा
समाजात बदल घडवायचा असेल, तर कृती आवश्यक आहे. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘आरोग्य शिबिरे’, ‘रक्तदान शिबिर’, आणि ‘पर्यावरण जनजागृती’ हे उपक्रम सामाजिक जबाबदारीचा भाग आहेत.

शिक्षण आणि उद्योजकता
शिक्षण आणि रोजगार ही समाज प्रगतीची दोन चाके आहेत. ‘विद्यार्थी मार्गदर्शन सत्रे’, ‘करिअर अवेअरनेस प्रोग्राम’, आणि ‘उद्योजकता मेळावे’ यांच्या माध्यमातून युवक आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक दिशा दिली जाते.

पर्यावरण आणि आरोग्य
निरोगी शरीर आणि स्वच्छ पर्यावरण हाच खरा विकासाचा पाया आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या ‘हरित मोहीम’, ‘जलसंवर्धन अभियान’, वृक्षारोपण आणि ‘आरोग्य जनजागृती’ उपक्रमांतून सामाजिक आरोग्याची जाणीव निर्माण केली जाते.

जिजाऊ वाचन कट्टा
महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी जेणेकरून महिलांमध्ये वैचारिक समृद्धता येईल. तसेच महिलांमध्ये वक्ता, लेखक, साहित्यिक निर्माण होईल आणि या अनुषंगाने माहील शिक्षितच नाही तर सुशिक्षित होतील हा या वाचनकट्ट्यामागचा उद्देश आहे

सावित्री जिजाऊ दशरार्तोत्सव
3 जानेवारी ते 12 जानेवारी या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सावित्री जिजाऊ दशरार्तोत्सव हा उपक्रम राबविल्या जातो. या माध्यमातून दहा दिवसामध्ये सर्व महानायिकांच्या विचाराचा जागर आणि प्रबोधनाचे विविध उपक्रम घेतले जातात. विविध स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, आरोग्य शिबीरे असे नानाविध उपक्रम राबविले जातात. मराठा सेवा संघ अंतर्गत जिजाऊ ब्रिगेडच्या या उपक्रमाची दखल शासनाने सुद्धा घेतली आणि काही वर्षांपासून शासकीय कार्यलयात हा उपक्रम सुरु केला आहे.

परिवर्तनवादी हळदी कुंकू
या हळदीकुंकू मध्ये सुवाशिनी सोबतच विधवा महिलांना सुद्धा सन्माने बोलवले जाते. प्लास्टिकचे डबे आणि कामात न येणाऱ्या वस्तू न देता वैचारिक वाण म्हणून वेगवेगळ्या पुस्तके दिली जातात

आरोग्य शिबिरे
महिलांच्या वाढत्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन महिलांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि महिलांनी स्वतःची नियमित तपासणी करावी यासाठी जिजाऊ ब्रिगेड कडून आरोग्य तपासणी शिबीरे घेतली जातात. त्यासाठी तज्ञ डॉक्टर बोलवून तपासणी व मार्गदर्शन केले जाते

आंदोलन निवेदन मोर्चा
जिजाऊ ब्रिगेडकडून महाराष्ट्रभर घडणाऱ्या घडामोडीवर वेळोवेळी आवाज उठवला जातो. जिजाऊ ब्रिगेड ने आजवर अनेक आंदोलने अनेक मोर्चे आणि अन्यायाविरुद्ध अनेक निवेदने शासनाला दिलेली आहेत.महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अशा अनेक सामाजिक प्रश्न घेऊन जिजाऊ ब्रिगेड या प्रश्नांसाठी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम वेळोवेळी करत असते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात अशा प्रकारचे आंदोलने असतील निषेध सभा असतील किंवा , निवेदन असतील याद्वारे सामाजिक घडामोडी मध्ये जिजाऊ ब्रिगेडचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे

युवा विकास कार्यक्रम
समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तरुण वर्ग. या टेक्नॉलॉजीच्या युगात तरुण वर्गामध्ये मूल्यशिक्षण, संस्कार, सामाजिक भान या गोष्टींचा अभाव आहे.यामुळे तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडकडून मार्गदर्शन शिबिरे,कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. त्यामधून तरुणांना एक वैचारिक दिशा देऊन त्यांना सक्षम बनवल्या जाते.करिअर मार्गदर्शन, समाजामध्ये वावरण्याचे भान आणि देशसेवा अशा अनेक विषयांवर त्यांच्यासोबत हितगुज केल्या जाते. मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे महापुरुषांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांच्यामध्ये विचार पेरले जातात.आज मुलींनाच संस्काराची गरज नाही तर मुलांना सुद्धा संस्कार देणे महत्त्वाचे आहे,छत्रपती शिवरायांचे आणि महापुरुषांचे विचार मुलांमध्ये रुजवणे खूप गरजेचे आहे. समाजामध्ये ज्या घटना घडतात त्याला केवळ मुली जबाबदार नसून जास्त प्रमाणात मुलांमध्ये असणारा संस्काराचा अभाव सामाजिक भान नसणे अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यासाठी जिजाऊ ब्रिगेड तरुण वर्गाला या विचारप्रवाहामध्ये जोडून एक सशक्त सुदृढ आणि सुसंस्कृत युवा वर्ग निर्माण करून समाजनिर्मितीचे काम करते

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांची आर्थिक प्रगती सुनिश्चित करणे हे जिजाऊ ब्रिगेडचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. उद्योजकता, कौशल्यविकास आणि आर्थिक साक्षरता याबाबत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. घरगुती उद्योग, स्वयंरोजगार आणि लघुउद्योगांसाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन पुरवले जाते. यातून महिलांमध्ये आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित केली जाते.

महिला दिन

Making the world a better place
Our Non-profit Organisation is dedicated to making the world a better place through various initiatives, such as providing education, healthcare, and disaster relief, to those in need. Join us in creating a brighter future for all.
Join us in our mission to create a positive impact in the world. Every little donation makes a huge difference.